४८५ गावांत एकाच दिवशी चावडीवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:59 AM2017-09-27T00:59:46+5:302017-09-27T00:59:46+5:30

जिल्ह्यातील ४८५ गावांमध्ये मंगळवारी कर्जमाफीसाठी दाखल अर्जांचे चावडीवाचन करण्यात आले

On the same day, in 485 villages, Chavadivachan | ४८५ गावांत एकाच दिवशी चावडीवाचन

४८५ गावांत एकाच दिवशी चावडीवाचन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४८५ गावांमध्ये मंगळवारी कर्जमाफीसाठी दाखल अर्जांचे चावडीवाचन करण्यात आले. थेट कर्जमाफीच्या लाभाशी निगडित याद्यांचे वाहन होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले.
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील तीन लाख ९६ हजार १९७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहे. प्राप्त अर्जांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) करण्यासाठी गाव निहाय चावडी वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या शेतकºयांनी कुटुंबातील किती सदस्यांच्या नावावर कर्ज घेतले, एकापेक्षा अधिक बँकांमधून कर्ज घेतले, अर्ज भरलेला शेतकरी इन्कम टॅक्स भरणा करतो का, कर्जमाफी अर्ज भरणारी व्यक्ती शासकीय सेवेत आहे का, एखाद्या व्यक्तीने भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जाबाबत गावातील कुणाला आक्षेप किंवा शंका आहे का याबाबतची माहिती चावडीवाचनातून मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे चावडीवाचन करणाºया कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय तिथे शेतकºयाच्या नावासमोर शेरा लिहिण्याच्या सूचना तालुका समितीने चावडीवाचन करणा-या कर्मचा-यांना दिल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या चावडीवाचन कार्यक्रमास शेतकºयांनी आवर्जुन हजेरी लावली. शेतकºयांनी उपस्थित केलेल्या शंकाचे या वेळी कर्मचाºयांनी निरसन केले.

Web Title: On the same day, in 485 villages, Chavadivachan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.