पेपर मिल्सना अडीच हजार कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:15 AM2017-08-04T01:15:05+5:302017-08-04T01:15:05+5:30
देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे (वस्तू व सेवाकर) पेपर मिल्सना या दोन महिन्यांतच सुमारे अडीच हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता इंडियन पल्प अॅण्ड पेपर टेक्निकल असोसिएशनने (आयपीपीटीए) गुरुवारी एका पत्रपरिषदेत वर्तविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे (वस्तू व सेवाकर) पेपर मिल्सना या दोन महिन्यांतच सुमारे अडीच हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता इंडियन पल्प अॅण्ड पेपर टेक्निकल असोसिएशनने (आयपीपीटीए) गुरुवारी एका पत्रपरिषदेत वर्तविला. झोनल असोसिएशनने या उद्योगांसाठी दोनदिवसीय चर्चासत्राचे आयोजन औरंगाबादेत केले असून, त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे अध्यक्ष पवन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत या उद्योगासमोरील अनेक बारकाव्यांवर माहिती दिली. यावेळी सेमिनार आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश राठी, आयपीपीटीएचे सचिव एम. के. गोयल यांची उपस्थिती होती.
अग्रवाल म्हणाले, गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत ४ लाख अब्ज टन पेपर उत्पादन केले जाते. त्यातील १ लाख अब्ज टन महाराष्ट्रात उत्पादन होते. यातून १२ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत २० टक्के उलाढाल मंदावण्याचे संकट पेपर मिल्ससमोर आहे.
दिवाळीच्या तोंडावर लागणारा कागद जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत खरेदी करण्याचे नियोजन मोठ्या प्रमाणात होत असते;