ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 03:04 PM2023-07-01T15:04:12+5:302023-07-01T15:05:17+5:30

बुटी बोरी येथून बसमध्ये बसलेल्या आयुष घाडगेनं बस दुर्घटनेचा थरारक अनुभव कथन केला.

Samruddhi mahamarg bus accident At the same time the plan changed and..; Aayush from Vidarbha Travels said, Good luck | ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

ऐनवेळी प्लॅन चेंज झाला अन्..; विदर्भ ट्रॅव्हल्समधील आयुषने सांगितली नशिबाची साथ

googlenewsNext

संभाजीनगर - समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. नागपूरहून-पुण्याला जाणाऱ्या या बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि डिझेल टाकी फुटल्यामुळे बसने पेट घेतला. या आगीत होरपळून बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ती म्हणत आयुष घाडगे या तरुणासाठी खरी ठरली. बसमधील सर्वात शेटवच्या म्हणजेच ३० नंबर सीटवरुन प्रवास करणाऱ्या आयुषने बस दुर्घटनेबद्दल माहिती देताना आपला जीव कसा वाचला ते सांगितलं. 

आयुष आणि त्याच्या मित्रांनी पुण्याला फिरायला जायचा प्लॅन केला होता. त्यासाठी, बुटी बोरीवरुन आम्ही सर्वजण मित्र सोबतच निघणार होतो. मात्र, ऐनवेळी प्लॅन चेंज झाला आणि मी एकटाच बुट्टी बोरीवरुन निघालो. माझे तीन मित्र वणीवरुन दुसऱ्या ट्रॅव्हल्सने बसले. आम्ही सर्वजण पुण्याला फिरायला जाणार होतो. पण, बसमध्ये साखरझोपेत असताना माझ्या अंगावर काहीतरी पडल्याचं मला जाणवलं. त्यामुळे, मला जाग आली. त्यावेळी, माझ्या अंगावर २-३ जण पडले होते. बसमध्ये आग लागली होती आणि अपघात झाल्याची जाणीव मला तेव्हा झाली. मी शेवटच्या सीटवर असल्याने शेजारील काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात मला यश आलं. माझ्यासोबत आणखी दोघांना आम्ही बसमधून बाहेर काढलं. 

बसमधून आम्ही बाहेर येताच बसचा स्फोट झाला, अगदी दोन मिनटांत मी ज्या सीटवर होतो, तेथेही आग लागल्याचं पाहिलं. डोळ्यासमोर मृत्यू पाहिला पण सुदैवाने मी वाचलो, असा थरारक अनुभव बसमधून प्रवास करणाऱ्या आयुष घाडगे याने सांगितला. विशेष म्हणजे या बसच्या मागील बसने आयुषचे मित्र येत होते, आयुषने बाहेर आल्यानंतर मित्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, वणी येथून बसलेले त्याचे मित्र घटनास्थळी आले, त्यांनी गाडीतून बाहेर येताच, आयुष घाडगे.. म्हणत मोठ-मोठ्याने आवाज दिला. मित्र, आयुषला जिवंत पाहून समाधान वाटल्याचं आयुषच्या मित्रांनी म्हटलं. नशिब बलवत्तर म्हणूनच आयुष आणि त्याचे मित्र या जीवघेण्या अपघातातून बचावले. ऐनवेळी प्लॅन चेंज झाला आणि मोठ्या दुर्घटनेतून त्यांचा बचाव झाला, असेच म्हणावे लागेल.  

दरम्यान, बसला अपघात झाला त्यावेळी बरेचसे प्रवासी साखरझोपेत होते. बस डाव्या बाजूला उलटल्यानं पुढील दरवाज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यावेळी काही प्रवासी मागच्या बाजूला गेले. बसच्या शेवटच्या आसनाच्या शेजारी आणि मागील बाजूस उजव्या बाजूच्या आसनाच्या जवळ असलेल्या इमर्जन्सी एक्झिटमधून ८ प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यापैकीच एक होता तो आयुष घाडगे. दरम्यान, या बसमधील बहुतांश प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे होते.

Web Title: Samruddhi mahamarg bus accident At the same time the plan changed and..; Aayush from Vidarbha Travels said, Good luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.