औरंगाबाद-पुणे महामार्गाच्या भूसंपादनासाठी समृद्धी पॅटर्न, चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:43 PM2022-12-16T19:43:36+5:302022-12-16T19:46:46+5:30
औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे.
औरंगाबाद: औरंगाबाद ते पुणे या महामार्गासाठी प्राथमिक अधिसूचना निघाली असून जिल्ह्यातील २४ गावांतून या मार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून समृद्धी महामार्गाच्या पॅटर्ननुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार, १५ डिसेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जी-२० च्या नियोजन बैठकीत सगळे अधिकारी असल्यामुळे भूसंपादनाची बैठक औपचारिकच ठरली.
चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकास महामंडळाकडे समन्वयाची जबाबदारी त्यासाठीच देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करील. बुधवारच्या बैठकीला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन आणि एमएसआरडीसीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूसंपादन प्रक्रियेशी निगडित सर्व घटकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.
दुसरीकडे नॅशनल हाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.यवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडेही स्वतंत्र भूसंपादन अधिकारी आहे. जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी आणि एनएचएआय या तीन यंत्रणात भूसंपादनावरून आगामी काळात प्रतिष्ठेचा मुद्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२४ गावांतून जाणार रस्ता
औरंगाबाद ते पुणे या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघाली असून औरंगाबाद तालुक्यातील ७ तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा मार्ग प्रस्तावित आहे. औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रूक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रूक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून रस्ता जाणार आहे.