सम्यक ग्रुप, क्रेडाईच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:22+5:302021-05-12T04:05:22+5:30
औरंगाबाद : सम्यक ग्रुप व क्रेडाईच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले. शहरात रक्ताचा तुडवडा लक्षात घेऊन ...
औरंगाबाद : सम्यक ग्रुप व क्रेडाईच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले.
शहरात रक्ताचा तुडवडा लक्षात घेऊन रविवारी (दि.९) हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
न्यू उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत शिबिराचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांच्या हस्ते झाले. सचिव अखिल खन्ना, सम्यक ग्रुपचे संचालक मनोज रुणवाल, पंकज ठोले, लायन्स ग्रुपचे सदस्य तनसुख झांबड, अशोक रुणवाल, प्रकाश रुणवाल, अनिल लुनिया व वंश लुनिया यांची यावेळी उपस्थिती होती.
शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सरकारच्या आदेशानुसार सर्व नियम पाळून शिबिर घेण्यात आले. यशस्वीतेसाठी सम्यक ग्रुपचे संचालक संदीप जैन, नितेश रुणवाल तसेच कर्मचारी किशोर नलावडे, रवी कोरी, किशोर डाके, शुभम आजगे, नीलेश राठोड आणि लायन्स ब्लड बँकचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश पाटणी यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन
सम्यक ग्रुप व क्रेडाई आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना क्रेडाई अध्यक्ष नितीन बगडिया,अखिल खन्ना, सम्यक ग्रुपचे संचालक मनोज रुणवाल, पंकज ठोले तसेच तनसुख झांबड आदी.