सोयगाव तालुक्यात प्रशासकीय इमारतीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:42+5:302021-03-13T04:05:42+5:30
तालुक्यात नव्याने २० तलाठी सज्जांसह सोयगावला तालुकास्तरावर प्रशासकीय मंजुरीला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला तातडीने प्रारंभ ...
तालुक्यात नव्याने २० तलाठी सज्जांसह सोयगावला तालुकास्तरावर प्रशासकीय मंजुरीला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला तातडीने प्रारंभ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी महसूल विभागाच्या आवाराच्या जागेची पाहणी करण्यात आल्यावर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांची भटकंती थांबणार आहे. या प्रशासकीय इमारतीत मंडळ अधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण, वन विभाग यासह शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयोगी असलेली सर्वच कार्यालये एकाच छताखाली येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
२० सज्जांच्या इमारतीला मंजुरी
सोयगाव तालुक्यातील २२ तलाठी सज्जांपैकी २० तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत सुरू असून, या तलाठी सज्जांना स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे आता या २० तलाठी सज्जांना मंजुरी मिळाली असल्याने सोयगाव तालुक्यात गाव पातळीवरील तलाठी सज्जा इमारतीविना राहणार नाही.