वाळूची ८ वाहने पकडली

By Admin | Published: September 28, 2014 11:31 PM2014-09-28T23:31:42+5:302014-09-28T23:51:38+5:30

औंढा नागनाथ : महसूल विभागाने जप्त केलेले अवैध वाळूचे साठे जप्त होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभागाला खडबडून जाग आली.

Sand 8 vehicles caught | वाळूची ८ वाहने पकडली

वाळूची ८ वाहने पकडली

googlenewsNext

औंढा नागनाथ : महसूल विभागाने जप्त केलेले अवैध वाळूचे साठे जप्त होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभागाला खडबडून जाग आली. त्यानुसार नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांना ताब्यात घेऊन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून नियमबाह्य वाळूचे साठे महसूल विभागाने जप्त केले होते. वाळूची माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात होती. शिवाय महिन्याच्या चौथ्या रविवारी वाळूची वाहतूक करण्यास शासनाची बंदी असतानासुद्धा वाहतूक होत होती. त्यामुळे रविवारी महसूल विभागाने धडक मोहीम राबविली. त्यात जिंतूर-औंढा, औंढा-हिंगोली रोडवर ८ टिप्पर हाती लागले. एमएच-०४ एच- १४४६, एमएच-३१ सीबी-६४९, एमएच-२१ डी-९२१३, एमएच-३७ बी-९८८, एमएच-३२ क्यू-२९४, एमएच-३१ सीबी- ७४०१, एमएच-३७ जे-४३२ आणि एक दगडाच्या ट्रकचा समावेश आहे. ही वाहने औंढा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत. सोमवारी वाहनांचे मोजमाप केले जाणार आहे. मापनानंतर अवध्ौ आढळलेल्या वाळूच्या तीनपट दंड लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी दिली.
पथकाने केली कारवाई
औंढ्याचे तहसीलदार शाम मदनूरकर, तलाठी माणिक रोडगे, माधव भुसावळे, विठ्ठल शेळके, बी.एम. हरण, ए.टी. चेंडगे, सोमटकर, डोंगरे, पुरी, वसमत पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानोबा पुरी, फौजदार सविता सपकाळ, प्रशांत भूते यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Sand 8 vehicles caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.