गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:58 AM2018-04-21T00:58:01+5:302018-04-21T00:58:13+5:30

तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.

 Sand smuggling from 'Girija' in the name of mud penny | गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

googlenewsNext

सुनील घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा गिरिजा मध्यम प्रकल्प असून हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने पाटबंधारे सिंचन विभागाने या प्रकल्पातून शेतकऱ्यांना गाळ पेरा नेण्याचे आवाहन केले. परंतु परिसरातील काही वाळू तस्करांनी महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून गाळ ऐवजी सर्रास दिवसरात्र वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पातून गाळ कमी आणि वाळूच जास्त उपसा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्री तर वाळूचा गोरखधंदा मोठा तेजीत सुरू असतो. तालुका प्रशासनास वाळू तस्करांनी हाताशी धरून गिरिजा प्रकल्पाचे लचके तोडण्याचे काम हाती घेतले आहे. आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी बारा वाजता गिरिजा मध्यम प्रकल्पात फेरफटका मारला असता प्रकल्पातील पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसजवळील एका विहिरीवर दोन ट्रॅक्टर वाळूचे भरलेले होते व त्यातील वाळू पाण्याने धुतली जात होती. तसेच प्रकल्पात एका बाजूस सर्रास वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. तर दुसºया बाजूने मशिनरीने गाळ उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. या गैरकामाचे फोटो काढताच ही प्रक्रिया लागलीच थांबली.
४या गोरखधंद्याबद्दल पोलीस पाटलांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांना लेखी माहिती दिली. गावातीलच वाळू तस्कर असल्याने ग्रामस्थही काही बोलत नाही. मात्र गिरिजा प्रकल्पातील वाळूचा उपसा करून या प्रकल्पाची चाळणी करण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्याचबरोबर कुठलीही परवानगी नसताना सर्रास वाळूचा उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करून वाळूचा हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. मात्र पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याबद्दल तालुक्यात याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नूतन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Sand smuggling from 'Girija' in the name of mud penny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.