शिवना, गांधारीतून लाखो रुपयांची वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:04 AM2021-03-09T04:04:46+5:302021-03-09T04:04:46+5:30

गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या महसूलला चुना लावून वाळू माफिया गब्बर होत आहेत. अहोरात्र ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात शिवना व गांधारी ...

Sand worth lakhs of rupees smuggled from Shivna, Gandhari | शिवना, गांधारीतून लाखो रुपयांची वाळू तस्करी

शिवना, गांधारीतून लाखो रुपयांची वाळू तस्करी

googlenewsNext

गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या महसूलला चुना लावून वाळू माफिया गब्बर होत आहेत. अहोरात्र ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात शिवना व गांधारी नदीमधून वाळू उपसा सुरू असून, अर्थपूर्ण संबंधामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाळू तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर प्रशासन १५ ते २० दिवस कडक धोरणे राबवून तस्करी रोखतात. यानंतर, पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबत कुठलाही अधिकारी दखल घेत नसल्याने दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

चौकट

रात्रभर ट्रॅक्टरच्या आवाजाने नागरिक त्रस्त

रात्रीच्या वेळी वाळूचे ट्रॅक्टर चालक मोठमोठ्या आवाजात गाणे वाजवत वेगाने ट्रॅक्टर चालवतात. यामुळे रात्रीच्या परिसरातील नागरिकांना झोपेचा त्रास होतो. मात्र, याला कोण लगाम घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

आम्ही प्रशासनाकडून रात्रीची वाळू तस्करांवर पाळत ठेवतो, पण त्यांना चोर मार्ग माहिती असल्याने आमच्या हाती लागत नाही. लवकरच कारवाई करू.

- दीपक एरंडे, तलाठी

छाया : हतनूर परिसरात नदीमध्ये वाळू उपशामुळे झालेले खड्डे.

Web Title: Sand worth lakhs of rupees smuggled from Shivna, Gandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.