विक्रीसाठी घेऊन जाणारे चंदन पकडले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:04 AM2021-06-11T04:04:12+5:302021-06-11T04:04:12+5:30
बाजारसावंगी : कन्नड येथे चंदन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांवर बाजारसावंगी पोलिसांनी कारवाई केली. कार व ६९ किलो चंदन मिळून ...
बाजारसावंगी : कन्नड येथे चंदन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांवर बाजारसावंगी पोलिसांनी कारवाई केली. कार व ६९ किलो चंदन मिळून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे यांना बाजारसावंगी मार्गे कन्नड येथे चंदन विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाजारसावंगी येथील मुख्य रस्त्यावर सापळा रचला. फुलंब्रीकडून आलेल्या कारला (एमएच २३ ई ८४८९) पोलिसांनी अडवून त्यात बसलेल्या तिघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच कारमध्ये ७९ किलो वजनाचे चंदन आढळून आले. हे चंदन कुंजखेडा येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी रऊफखा रशिदखा पठान, इरफान खान नवाजखान पठाण, जावेदखान नजीरखान पठाण (तिघेही रा. फाजलवाडी, ता. फुलंब्री) या तिघांना अटक करण्यात आली, तर १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ६९ किलो चंदन व कार, मोबाइल असा ४ लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
----
फोटो :
100621\sayyad lal sayyad chand_img-20210610-wa0072_1.jpg
बाजारसांगी