संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

By संतोष हिरेमठ | Published: October 15, 2022 11:57 AM2022-10-15T11:57:43+5:302022-10-15T11:59:46+5:30

पालकमंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Sandipan Bhumre's reliance on government hospitals; Dental treatment taken during inspection visit | संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

संदीपान भूमरेंचा सरकारी दवाखान्यावर भरवसा; पाहणी दौऱ्यात घेतले दंतोपचार

googlenewsNext

औरंगाबादपालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पाहणी करत घाटी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. याच दौऱ्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात त्यांनी आपले दंतोपचार घेतले. घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळणे गरजेचे आहे. घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी शुक्रवारी सांगितले. 

या बैठकीस आमदार प्रदीप जैस्वाल, घाटी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे,  डॉ.विजय कल्याणकर उपअधिष्ठाता डॉ.एम.एस.बेग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. येरेकर, डॉ.शेंडगे, महावितरणचे चिंचनकर यांची उपस्थिती होती.

या भेटीदरम्यान भुमरे यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थितीचा देखील आढावा घेतला आढावा घेताना त्यांनी आपले दंतोपचार देखील घेतले. पालकमंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रुग्णालयांवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Sandipan Bhumre's reliance on government hospitals; Dental treatment taken during inspection visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.