राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत सांगलीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:00 AM2017-12-25T01:00:59+5:302017-12-25T01:01:17+5:30
सायकल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७० कि. मी. अंतराच्या सायकल स्पर्धेत सांगलीच्या शाहीद जमालेकर याने रेसिंग प्रकारात आणि सांगलीच्याच प्रकाश ओळेकर याने सिंगल गेअर प्रकारात अव्वल स्थान पटकावले.
औरंगाबाद : सायकल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन घोगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ७० कि. मी. अंतराच्या सायकल स्पर्धेत सांगलीच्या शाहीद जमालेकर याने रेसिंग प्रकारात आणि सांगलीच्याच प्रकाश ओळेकर याने सिंगल गेअर प्रकारात अव्वल स्थान पटकावले.
सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी क्रांतीचौकापासून या स्पर्धेस प्रारंभ झाला. क्रांतीचौक ते बदनापूर आणि परतीच्या प्रवासाने बदनापूर येथून येऊन या स्पर्धेचा समारोप चिकलठाणा येथे झाला. रेसिंग प्रकारात शाहीद जमालेकर याने ७० कि. मी. अंतर १ तास २६ मिनिटे व १८ सेकंदात पूर्ण केले तर सिंगल गेअर प्रकारात प्रकाश ओळेकर याने हे अंतर १ तास ३२ मिनिटे व २६ सेकंदात पूर्ण केले.
निकाल (रेसिंग) : १. शाहीद जमालेकर, २. सोहेल बरगीर, ३. किरण बंडगारे (सांगली), ४. संकल्प थोरात, ५. कृष्णा हराळ, ६. श्रीनिवास लोंढे (अहमदनगर), ७. विवेक वायकर, ८. कुणालसिंग, ९. मकरंद माने (पुणे), १०. दिलीप माने (सांगली).
सिंगल गेअर : १. प्रकाश ओळेकर, २. राम जाधव (सांगली), ३. शेख खुदबोद्दीन (परभणी), ४. विकास रोठे, ५. संभाजी मोहिते (अहमदनगर), ६. हर्षल शेंडे (वर्धा), ७. सुलतान शेख (नांदेड), ८. कार्तिक येलने, ९. प्रशांत काळपांडे (वर्धा), १०. भीमराव चव्हाण (औरंगाबाद). तत्पूर्वी, उद्घाटन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व नितीन घोगरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव संजय साठे, खजिनदार भिकन अंबे, साईनाथ थोरात, राधिका अंबे, अमृत बिºहाडे, अजिंक्य सांगळे, भिरू भोजने, भाऊसाहेब मोरे, अमोल जोशी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश जाधव, दिगंबर डोळस, विलास राजपूत, सुनील रत्नपारखे, विलास यादव, आर. के. संदीप, राम यौवगीकर, अक्षय बनकर व लखन म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.