लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:30 AM2017-12-19T00:30:58+5:302017-12-19T00:31:02+5:30
लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर सीआरटीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याच्या बाटल्या, कागद आदी १२७४ किलो कोरडा कचरा जमा करण्यात आला. यातून ‘माझे शहर स्वच्छ शहर’ हा संदेश देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर सीआरटीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याच्या बाटल्या, कागद आदी १२७४ किलो कोरडा कचरा जमा करण्यात आला. यातून ‘माझे शहर स्वच्छ शहर’ हा संदेश देण्यात आला.
लोकमत महामॅरेथॉनला रविवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. धावपटूंसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटू पाणी पिऊन प्लास्टिकच्या बाटल्या डस्बिनमध्ये किंवा प्लास्टिकच्या पोत्यात टाकून पुढे जात होते. हा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम सीआरटीचे १७ सदस्य व काबरा कॉलेजच्या १०० विद्यार्थ्यांनी केले. संपूर्ण महामॅरेथॉन मार्गावर जागोजागी पहाटे ३.३० ते सकाळी ११.३० पर्यंत स्वयंसेवक उभे होते. खाली झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, ज्यूस बॉक्स जमा केले जात होते. सुका कचरा भरण्यासाठी पांढºया रंगाचे प्लास्टिकचे पोते आणण्यात आले होते. कचरा जमा करण्याचे काम नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने राबविले जात होते. महामॅरेथॉन संपल्यानंतर मार्गावर एकही प्लास्टिक बाटली, ज्यूस बॉक्स आढळून आले नाही. बाटल्यांमध्ये राहिलेले पाणी स्वयंसेवक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना टाकीत होते. एवढी काळजी घेण्यात येत होती. यात १२७४ किलो कोरडा कचरा जमा झाला. यासाठी विविध मार्गांवर ३७ गाड्यांचा वापर करण्यात आला. कोरडा कचरा रिसायकलिंगसाठी कॅनपॅक ड्राय वेस्ट शॉर्टिंग सेंटर येथे देण्यात येणार आहे. सीआरटीतर्फे शहरात ‘बजाज माझी सिटी स्वच्छ सिटी’ अभियान राबविण्यात येत आहे. सीआरटीच्या व्यवस्थापकीय संचालिका निताशा जहरीन व गौरी मिराशी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान यशस्वी केले.