शौचालय, नळजोडणी योजनेस मंजुरी

By Admin | Published: September 8, 2014 12:01 AM2014-09-08T00:01:35+5:302014-09-08T00:04:59+5:30

परभणी: नळजोडणी व वैयक्तिक शौचालय योजनेस मंजुरी मिळाल्याची माहिती महापौर यांनी दिली.

Sanitation for toilet, nos | शौचालय, नळजोडणी योजनेस मंजुरी

शौचालय, नळजोडणी योजनेस मंजुरी

googlenewsNext

परभणी: महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलित वस्ती, पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबियांना नळजोडणी व वैयक्तिक शौचालय योजनेस मंजुरी मिळाल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
या योजनेअंतर्गत परभणी शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडणीसाठी प्रतिकुटुंब ४ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करुन देण्यासाठी ९० टक्के शासकीय अनुदान मिळणार असून १० टक्के रक्कम संबंधित लाभार्थ्यांचा वाटा राहणार आहे. तसेच शहरातील प्रभागामध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील २ हजार ८५० लाभधारकांना लाभ होणार असून यासाठी १ कोटी १४ लाख रुपये तर २ हजार ७२३ वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी २७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sanitation for toilet, nos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.