‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकच्या मार्गदर्शकपदी संजय गाढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:12 AM2018-01-20T00:12:21+5:302018-01-20T00:12:36+5:30
३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद : ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे.
२०१७-१८ या वर्षात ‘खेलो इंडिया’अंतर्गत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत प्रथमच १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या १३ खेळ प्रकारांत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होत आहेत. यापैकी जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी संजय गाढवे यांची मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे, तर पुण्याच्या संजीवनी पूर्णपात्रे या संघव्यवस्थापक आहेत. मुलांच्या संघासाठी प्रवीण ढगे संघव्यवस्थापक, तर योगेश शिर्के मार्गदर्शक आहेत. स्पर्धेपूर्वी २१ जानेवारीपासून पुणे येथे प्रशिक्षण शिबीर होणार असून, जिम्नॅस्टिक स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होतील. निवडीबद्दल गाढवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.