मनपाच्या कर वसुली पथकाचे प्रमुख संजय जक्कल निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 03:08 PM2018-11-13T15:08:09+5:302018-11-13T15:09:40+5:30
वसुली पथकाचे प्रमुख म्हणून संजय जक्कल हे काम पाहत होते.
औरंगाबाद : महापालिकेतील मालमत्ता कर वसुलीसाठी ९ पथक नेमले आहेत. या पथकाचे प्रमुख असलेल्या संजय जक्कल यांनी कामात निष्काळजीपणा केला म्हणून आयुक्त निपुण विनायक यांनी आज निलंबित केले.
यंदाचे महापालिकेचे कर वसुलीचे उद्दिष्ट सुमारे ४५० कोटी रुपये आहे. मागील वर्षी ८० कोटी वसूल झाले होते. यंदा सर्वाधिक वसुलीचा विक्रम करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. यातूनच मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून वसुली आणि नियमितीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आयुक्तांनी ९ पथके स्थापन करून वसुली मोहीम सोमवार पासून सुरु केली आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून संजय जक्कल हे काम पाहत होते. आज आयुक्तांनी कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल जक्कल यांना निलंबित केले.
दरम्यान, आत्तापर्यंत आयुक्तांनी ३ मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पहिले उपायुक्त रवींद्र निकम , प्राणिसंग्रहालय संचालक डॉक्टर बी .एस . नाईकवाडे आणि आज जक्कल यांना आयुक्तांनी निलंबित केले.