संजय नवले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:02 AM2021-04-16T04:02:16+5:302021-04-16T04:02:16+5:30
गेल्या काही दिवसांपासून ‘कोविड’ने आजारी असल्यामुळे ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे चोराखळी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील ...
गेल्या काही दिवसांपासून ‘कोविड’ने आजारी असल्यामुळे ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे चोराखळी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी असलेले डॉ. नवले हे ३० वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. विद्यापीठाच्या युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य, महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. डॉ. नवले यांनी ४६ ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. हिंदीत १९, मराठीत १३ पुस्तकांचे लेखन तर १४ पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. विशेषत : फुले-शाहू-आंबेडकरी साहित्याचे ते कृतिशील अभ्यासक होते. डॉ. नवले यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नीता, एक मुलगी असा परिवार आहे. (फोटो)