"संजय राऊतांपासून एका महिलेस मुल..."; संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:31 PM2023-06-03T13:31:51+5:302023-06-03T13:32:35+5:30
एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेपासून राऊत यांना एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल.
छत्रपती संभाजीनगर: विचारले पटले नाहीत तर बोला, पण एखादा प्रश्न विचारला असता थुंकणे हे योग्य नाही. या कृतीवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशा वागण्याचे कारण म्हणजे, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांचे कोणाशीच जमत नाही. अशी लायकी नसलेल्या माणसाकडून एका महिलेला मुल आहे, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रश्न विचारला असता उत्तर टाळून ते थुंकले. या कृतीवर शिवसेना शिंदे गटातून तीव्र पडसाद उमटले आहेत. याबाबत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, राऊत यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो दाखवा, उद्धव ठाकरे यांचा गट संपविण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळते, त्यांना योग्य वेळी उत्तर दिले आहे. प्रसिद्धी मिळवणे हाच यांचा धंदा आहे. नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा यांनी काय गोंधळ घातला. एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेस राऊत यांच्यापासून एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. अशी लायकी नसलेली माणसे राजकारणात आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली.
राऊत पुन्हा तुरुंगात जातील
संजय राऊतांनी नेमका काय पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे. या प्रकरणांचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगा जातील, असा दावाही शिरसाट यांनी केला.