छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संजीव भोर
By संतोष हिरेमठ | Updated: June 6, 2024 16:35 IST2024-06-06T16:34:43+5:302024-06-06T16:35:05+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते.

छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संजीव भोर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांची नागपूर (ग्रामीण) प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते. तत्कालिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांची कोरोना काळात प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळाला. त्यानंतर जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याकडे हा भार देण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी कधी मिळतात, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले होते. अखेर संजीव भोर यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले आहेत.