"संत रविदास, सेवालाल महाराजांनी समतेचे विचार मांडले"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:03 AM2021-02-21T04:03:27+5:302021-02-21T04:03:27+5:30
बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या वतीने कॅनॉट प्लेस येथे आयोजित संत रविदास व सेवालाल महाराजांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत ...
बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या वतीने कॅनॉट प्लेस येथे आयोजित संत रविदास व सेवालाल महाराजांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी या दोन्ही संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाबद्दल त्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. बछिरे यांनी संत रविदास यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर राठोड यांनी सेवालाल महाराजांनी त्याकाळी वर्तविलेली भाकिते आज कशी खरी ठरत आहेत हे स्पष्ट केले. रामभाऊ पेटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अंबादास रगडे यांनी आभार मानले. एस. एम. थोरे, एकनाथ रामटेके, संजय चिकसे, दुर्गादास गुडे, तोताराम जाधव, मारुती साळवे, सरस्वती हरकळ, प्रा.कीर्तीलता पेटकर, रोहिदास पवार, सोमीनाथ सुरडकर आदींची उपस्थिती होती.