फत्तेपूरच्या सर्पमित्राचा सर्पदंशाने झाला मृत्यू
By Admin | Published: September 9, 2015 12:08 AM2015-09-09T00:08:00+5:302015-09-09T00:26:37+5:30
भोकरदन : भोकरदनपासून दोन कि़मी. अंतरावर असलेल्या फत्तेपूर येथील सर्पमित्र पुनम गिरी (३०) यांना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान साप चावला
भोकरदन : भोकरदनपासून दोन कि़मी. अंतरावर असलेल्या फत्तेपूर येथील सर्पमित्र पुनम गिरी (३०) यांना ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान साप चावला. यातच या सर्पमित्राचा मृत्यू झाला.
भोकरदन शहरासह फत्तेपूर परिसरात कोठे ही साप निघाला तर हा साप पकडण्यासाठी पुनम गिरी यांना पाचारण करण्यात येत होते. कसाही साप असला तरी पुनम मात्र सापाला पकडून नंतर जंगलामध्ये किंवा केळना नदीच्या पात्रात सोडून देत असे. हे गेल्या दहा वर्षांपासून तो सहज करीत असल्याने त्याची या परिसरात सर्पमित्र म्हणून ओळख झाली होती.
मात्र ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फत्तेपूर येथील बरडे यांच्या घरात साप निघाला असता पुनम यांना बोलावण्यात आले . त्यांनी सापाला पकडले सुद्धा मात्र सापाला खेळविण्याची सवय असल्याने त्यांनी साप एका गोणीमध्ये घातला. ही गोणी डोक्यात घातली. त्यामुळे विषारी असलेला साप चवताळला व त्याने पुनमच्या डोक्यात दोन तीन दंश
मारले.
हा प्रकार पुनम यांनी गांभीर्याने घेतला नाही. त्यानंतर १२ वाजेच्या दरम्यान शरीरामध्ये विष भिणल्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याही अवस्थेत साप त्यांच्या डोक्यावरच होता. त्यानंतर नागरिकांना पुनम यांस भोकरदन येथील
ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरानी त्यास मयत घोषीत केले़ (वार्ताहर)