अंजना व पूर्णा नदीतून सर्रास वाळू तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:52 PM2019-04-12T23:52:55+5:302019-04-12T23:53:46+5:30
येथून जवळच असलेल्या उपळी व दिडगाव येथील अंजना व पूर्णा नदीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे.
भराडी : येथून जवळच असलेल्या उपळी व दिडगाव येथील अंजना व पूर्णा नदीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे.
अंजना व पूर्णा नदीपात्रातून दररोज सायंकाळी ६ वाजेपासून रात्रभर वाळू उपसा करून अवैधरित्या वाहतूक केली जाते. रोज पंधरा ते वीस ट्रॅक्टर येथून वाळू वाहतूक करतात. रात्रभर ही वाहने भरधाव वेगाने जात असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. वाळू उपशामुळे अंजना व पूर्णा नदीची अक्षरश: चाळणी झाली असून नदीपात्रात यामुळे जागोजागी पंधरा ते वीस फूटांचे खड्डे पडलेले आहेत. वाळूतस्करांना नदीशेजारील शेतकऱ्यांनी अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, वाळू तस्कर जीवे मारण्याची धमकी देत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दिडगाव, उपळी येथील नागरिकांनी केली आहे.