सारीचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:09 PM2020-10-10T17:09:10+5:302020-10-10T17:09:44+5:30
गील ७ महिन्यात शहरात सारी आजाराचे २ हजारांपेक्षाही अधिक रूग्ण सापडले असून गुरूवारी १४ नवीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद : मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सारी हा नवा आजारही समोर आला. मागील ७ महिन्यात शहरात सारी आजाराचे जवळपास २ हजार रूग्ण सापडले असून गुरूवारी १४ नवीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
यातील चिंताजनक बाब म्हणजे कोरोना आणि सारी या आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. यामुळे महापालिकेसह आरोग्य विभागासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरूवारी आढळून आलेल्या १४ रूग्णांपैकी २ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे सारी आणि कोरोना हे दोन्ही आजार असणाऱ्या रूग्णांची संख्या आता ६७८ झाली आहे. सारी आजारामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.