गावाच्या विकासाबाबत सरपंचांचे मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:04 AM2021-07-24T04:04:26+5:302021-07-24T04:04:26+5:30
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ग्रामसंवाद सरपंच ...
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ग्रामसंवाद सरपंच संघ प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. बैठकीसाठी गडचिरोलीतील महिला सरपंचांनीही भाग घेतला. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी हजेरी लावली. गाव विकास कसा करायचा यासंदर्भात राज्य प्रवक्ता भाऊसाहेब काळे, मराठवाडा विभागप्रमुख किरण घोंगडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश अहिरे पाटील, विदर्भ विभाग अध्यक्ष दिगंबर धानोरकर, शिव शंकर काळे,गंगा धांडरे यांनी मत मांडले. यावेळी अजित सिंग राजपूत, नीलेश फुलगमकर,मलारेड्डी यालनवार, सतीश पवार, मोहन पाटील ,राहुल धामणे ,राहुल बोडके, निखिल धामणे,अनिल भालेराव, सविता आहाके, गंगाताई ताठे, अतुल घुगे आदी उपस्थित होते.
कॅप्शन
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या बैठकीत संघटनेच्या छोट्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.