पाणी बचतीसाठी सरसावली हॉटेल्स

By Admin | Published: May 15, 2016 12:01 AM2016-05-15T00:01:55+5:302016-05-15T00:06:32+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये तसेच शहरांमध्ये असलेल्या तीव्र जलसंकटाने जनसामान्य हवालदिल झाले आहेत.

Sarsawi Hotels to save water | पाणी बचतीसाठी सरसावली हॉटेल्स

पाणी बचतीसाठी सरसावली हॉटेल्स

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये तसेच शहरांमध्ये असलेल्या तीव्र जलसंकटाने जनसामान्य हवालदिल झाले आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत पाण्याची बचत आणि पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ हाती घेतले. आलेल्या ग्राहकाला पाणी देऊनच व्यवसायाची सुरुवात होणाऱ्या हॉटेल क्षेत्रात पाण्याचा सर्वाधिक वापर होतो. पाणी बचतीचे कार्य हाती घेताना हॉटेल व्यावसायिकांसारख्या महत्त्वपूर्ण घटकाला वगळून चालणार नव्हते. त्यामुळेच या अभियानात सामील होण्यासाठी सर्वप्रथम हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले. या अभियानात शहरातील तब्बल ५१ हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले. या अभियानांतर्गत शहरातील विविध हॉटेल्समध्ये जाऊन तेथे पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यात आली. हॉटेलमध्ये प्रवेश करताच प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले ‘लोकमत जलमित्र अभियान’चे फलक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. हॉटेलच्या वॉशरूममध्ये पाण्याचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. त्यामुळे तेथेही पाण्याच्या बचतीविषयी जनजागृती करणारे फलक ठेवण्यात आले होते. हॉटेलच्या प्रत्येक टेबलवर ‘हाफ ग्लास आॅफ वॉटर’ अशी थीम असलेले ‘टेन्ट कार्ड’ ठेवण्यात आले. यातून गरज असेल तेवढेच पाणी घ्यावे, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर एक ड्रम ठेवला गेला. उरलेले पाणी या ड्रममध्ये एकत्रित करावे, असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना आणि ग्राहकांना यामार्फत करण्यात आले. आम्हाला कळवा... पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत. अभियानात सामील झालेले ‘जलमित्र हॉटेल्स’ ग्रीन लीफ, हॉटेल अतिथी रूफ टॉप, स्काय कोर्ट, विंडसर कॅसल, स्वाद, निशांत पार्क, द साल्ट, गोविंदा रेस्टॉरंट, हॉटेल एमएच-२०, तुलसी, गिरीराज, क्रेझी बाईट, सॅसी स्पून, व्हिटस्, क्रीम अ‍ॅण्ड क्रंच, बग्गा इंटरनॅशनल, कार्तिकी, अंगिठी, नवनाथ, क्युबा ३, लिटील इंडिया, ग्रीन पार्क, शिवाज रेस्टॉरंट, लाडली, झुणका-भाकर केंद्र, अन्नपूर्णा रेस्टॉरंट, स्काय टच, नैवेद्य, ओम साई, व्हीआयपी मराठा, हॉटेल वृंदावन काटाकिर्र, सुरभी फॅमिली रेस्टॉरंट, सूर्या फॅ मिली रेस्टॉरंट, हॉटेल जैन भोज, पिनिकेश्वर, स्माईल, फ्रेश बेकर्स, न्यू सागर रेस्टॉरंट, बेकर्स लॉन्ज, दिनशॉज आइस्क्रीम सेंटर, दुर्गाज कॅफे, बसकीन्स रॉबिन्स, चटक मटक, कॅफे कॉफी डे, झीरो डीग्री आईस पार्लर, हॉटेल पिव्हेल्स, हॉटेल छत्रपती, फ्रे श ज्यूस सेंटर, लकी ज्यूस सेंटर, हॉटेल स्टरलाईट इन, कॅफे १९४७.

Web Title: Sarsawi Hotels to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.