सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:06 AM2018-04-21T00:06:44+5:302018-04-21T00:08:13+5:30

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Satara-Devlaiikar is now being repented | सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदच हवी होती : पाणी, रस्ते, दिवे, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा अभाव; मालमत्तांना दर येईना

साहेबराव हिवराळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुविधांच्या अभावामुळे मालमत्तांचे दरही खाली आले आहेत.
सातारा-देवळाई ग्रामपंचायती नगर परिषदेत विलीन झाल्या. वॉर्ड रचना, आरक्षणदेखील घोषित झाले. विकासकामासाठी १०० कोटींचा निधी येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नवीन नोटिफिकेशन जाहीर झाले अन् शहरालगतचे क्षेत्र असल्याने ते महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.
सातारा-देवळाईतील नागरिकांनी शासनदरबारी व न्यायालयातही लढाई लडविली. मात्र, सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. दोन्ही वॉर्डांतून लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, परिसरातून मालमत्ता कर वसुलीशिवाय इतर सेवा-सुविधा देण्यावर मनपाचे लक्ष नाही.
तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आमदार निधीशिवाय मनपाने विकासकामावर खर्च केला नाही. त्यामुळे टोलेजंग इमारतीकडे पाहत नागरिकांना चिखलातून वाट काढीत घर गाठावे लागतेय. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सेवेसाठी सतत संघर्षाची भूमिका नागरिकांना पार पाडावी लागते. सेप्टिक टँकचे सांडपाणी रस्त्यावर, मोकळ्या प्लॉटवर तुंबल्याने रोगराईची भीती सतत आहे.
वीजपुरवठा सतत खंडित
शहरात असूनदेखील दररोज खेड्यातील लोडशेडिंगसारखे सातारा-देवळाईकरांंना वीज गुल होण्याचा अनुभव येतो. संपर्क करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. उन्हाळ्यात उकाडा व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागते, अशी खंत जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली.
खेड्यांतील रस्ते गुळगुळीत झाले आहेत; परंतु सातारा-देवळाईकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची प्रतीक्षा आहे. विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.
आंदोलनाच्या पवित्र्यात
सेवा-सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सातारा-देवळाई संघर्ष समिती नगर परिषदेच्या मागणीसाठी आंदोलन उभारेल, असा इशारा पद्मसिंह राजपूत, राहुल सिरसाठ, सोमीनाथ शिराणे, इम्रान पटेल, आबासाहेब देशमुख, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, नीलेश चाबूकस्वार यांनी दिला आहे.
मनपापेक्षा नगर परिषद बरी
येथे ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात होता. नगर परिषदेनेदेखील केला; परंतु मनपा मोफत टँकर देत नाही, पैसे भरूनही ते पाठवीत नाही. नाईलाजाने खाजगी टँकरवर तहान भागवावी लागते. मनपापेक्षा नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे एकनाथ काळे म्हणाले.

Web Title: Satara-Devlaiikar is now being repented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.