सातारा-देवळाईकरांना पुन्हा ‘गाजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:54 PM2018-02-15T23:54:26+5:302018-02-15T23:54:36+5:30
‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘सातारा-देवळाईत आश्वासने नको पूर्तता करा’ या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला ठोस आश्वासन देण्याऐवजी महापौर यांनी पुन्हा ‘गाजर’ दाखविले.
सातारा-देवळाईकरांचा निषेध मोर्चा रेणुकामाता मंदिर कमानीपासून गुरुवारी दुपारी काढण्यात आला. मोटारसायकली तसेच खाजगी बसमधून महिलांचा मोर्चा मनपा मुख्य कार्यालयावर धडकला. ‘टॅक्स घ्या, पण सुविधा द्या, मनपापेक्षा ग्रामपंचायत बरी, सातारा देवळाई झाले भकास, लवकर करा विकास, सातारा-देवळाईला मनपाने दिले गाजर, विकास आमचा हक्काचा नाही तुमच्या मनाचा, रस्ते करा रस्ते करा सातारा देवळाईचे रस्ते करा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रवेशद्वारासमोर मोर्चेकºयांची प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्याने महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, राजू वैद्य, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब जगताप, सिद्धांत शिरसाट हे मोर्चेकºयास समोरे येऊन त्यांनी सर्वांच्या व्यथा ऐकून घेतल्या. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन या प्रमुख मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन गेल्या दोन महिन्यांपूर्वी नागरिकांच्या भेटी घेऊन दिले. मात्र, त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी महापौर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
मीटिंग सुरू असून उद्या लेखी देऊ
समस्या सोडविण्याविषयी लेखी आश्वासन द्यावे, तोंडी आम्ही ऐकणार नाही असा पवित्रा मोर्चेकºयांनी घेतल्याने महापौर यांनी सांगितले की, आज सभा सुरू असून, तुमची गाºहाणी ऐकण्यासाठी मी स्वत: बाहेर आलो आहे. ड्रेनेज व रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून कामे मार्गे लागणार आहेत; परंतु नागरिकांनी लेखी आश्वासनाचा आग्रह धरल्याने वेळ मारून नेत महापौर यांनी उद्या तुमचे एक शिष्टमंडळ कार्यालयात या, लेखी आश्वासन देण्यात येईल, असे म्हणून महापौर यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी काढता पाय घेतला. पुन्हा सातारा-देवळाईकरांंना मनपाने ‘गाजर’ दाखविल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट तयार झाली.
टॅक्स घ्या मात्र सुविधा द्या
४परिसरात सेवा-सुुविधा पुरवून टॅक्स घ्यावा, नुसते मतापुरताच सातारा-देवळाईचा वापर नसावा, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. सातारा-देवळाई संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चात सोमीनाथ शिराणे, पद्मसिंग राजपूत, रमेश बाहुले, आबासाहेब देशमुख, संजय कुलकर्णी, रामेश्वर पेंढारे, राजू कुलकर्णी, असद पटेल, सलीम पटेल, लक्ष्मण किर्दक, राहुल शिरसाट, हनुमान कदम, छोटू कदम, दिनेश चव्हाण, सूरज बडग, सचिन पैठणे, हकिम पटेल, मनोज शितोळे, महेंद्र रमंडवाल, मुकेश गोरे, रणजित ढेपे, गणेश येवले, अजिंक्य गायकवाड, गुलाब पवार, स्मिता पठारे, रंजना देसाई, पंकज सोनार, अर्चना राणा, सचिन कांबळे, के.आर. मोरे, कांताबाई मोरे, मार्तंड कुलकर्णी, सुवर्णा सोळुंके, बबिता विक्टोरिया, सुमन पाटील, नीलेश चाबूकस्वार, गोविंद पाटील, महेश नाईक, राजेश निंदमवार, सुनीता महाजन, योगिता होलीय आदींसह शेकडो महिला व नागरिकांचा सहभाग होता.