सातारा- देवळाई परिसरातील मोबाईल टॉवर व मोकळ्या जागांचा शोध सुरू
By Admin | Published: May 10, 2016 12:36 AM2016-05-10T00:36:51+5:302016-05-10T00:56:29+5:30
औरंगाबाद : सातारा- देवळाई ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात लावण्यात आलेला टॅक्स पुढे रेग्युलराईज केला की नाही आणि दोन्ही वॉर्डातील
औरंगाबाद : सातारा- देवळाई ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात लावण्यात आलेला टॅक्स पुढे रेग्युलराईज केला की नाही आणि दोन्ही वॉर्डातील रिकामे भूखंड व उद्यानाचा शोध सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे इत्यादी प्रमुख समस्यांसह उद्यान, खेळाचे मैदान, तसेच कोणत्या भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे, त्याची माहिती काढण्याचे काम मनपाच्या वतीने सुरू केले आहे. वॉर्डात सोयी-सुविधा देण्यासाठी आता अधिकृत मनपा प्रयत्न करीत आहे. सध्या नागरिकांना
पाणीपुरवठा टँकर व ड्रमच्या मापात केला जात असून, मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही.
ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात ज्या स्थावर मालमत्ता होत्या त्या सर्व मनपात वर्ग झाल्या असे म्हटले जाते. परंतु दोन्ही वॉर्डात किती उद्याने आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या काळातील टॅक्स अदा केला जात आहे. नव्याने बैठका घेऊन सेवा-सुविधा पुरविल्यावर कर आकारण्यात येणार आहे; परंतु आताच्या दोन्ही वॉर्डात असलेल्या मोबाईल टॉवरवर पूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती. त्यांनी ते टॉवर रेग्युलराईज केले आहेत का, याचा शोधही मनपाचे अधिकारी घेत आहेत.
पाऊणलाख लोकसंख्या असलेल्या परिसरात आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक दिसत नाही. छत्रपती क्रीडा संकुल सोडले तर इतर उद्याने आहेत कुठे, असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.