सातारा यात्रेचा समारोप
By Admin | Published: December 20, 2015 11:52 PM2015-12-20T23:52:52+5:302015-12-20T23:55:06+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरात गुरुवारी चंपाषष्ठीपासून खंडोबाची यात्रा सुरू झाली. गुरुवारच्या तुलनेत रविवारी तुफान गर्दीचा सुपर संडे राहिला.
औरंगाबाद : सातारा परिसरात गुरुवारी चंपाषष्ठीपासून खंडोबाची यात्रा सुरू झाली. गुरुवारच्या तुलनेत रविवारी तुफान गर्दीचा सुपर संडे राहिला. रविवार असल्याने आबालवृद्धांनी रांगेतूनच दर्शन घेतले. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता.
सातारा परिसरात गुरुवारपासून वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य सुरू होता; परंतु रविवारी ‘कंदुरी’चा बेतही अनेकांनी आखला होता. मोकळ्या मैदानात विविध भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. चारचाकी वाहनांची तुफान गर्दी झाली होती. वाहन पार्किंग मंदिरापासून दूर एमआयटीच्या लगत ठेवल्याने रस्त्यावर भाविकांची गर्दी आढळून येत होती. यात्रा सुरळीत पार पडल्याने ट्रस्ट व सातारा परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स विसरली होती ती एका महिलेने पोलिसांकडे जमा केली. यात्रेत प्रत्येक कॉर्नरवर पोलीस व सीसीटीव्हीची नजर असल्याने चोऱ्यांना आळा घालणे सोपे झाल्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.