साठे साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
By Admin | Published: March 18, 2016 12:10 AM2016-03-18T00:10:34+5:302016-03-18T00:17:16+5:30
नांदेड : वाड़मयीन, सामाजिक व क्रीडा पुरस्कार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ विठ्ठल भंडारे व बहुजन नायक अण्णा भाऊ साठे अभ्यास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रा़ सदाशिव भुयारे यांनी गुरूवारी जाहीर केले़
नांदेड : अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे वाड़मयीन, सामाजिक व क्रीडा पुरस्कार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ विठ्ठल भंडारे व बहुजन नायक अण्णा भाऊ साठे अभ्यास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रा़ सदाशिव भुयारे यांनी गुरूवारी जाहीर केले़
यावर्षाचा मुक्ता साळवे पुरस्कार प्रा़ डॉ़ माधव बसवंते यांच्या पॅट्रॉन आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त बहुभाषिक संशोधन मासिकाला, शंकरभाऊ साठे पुरस्कार प्रा़ डॉ़ सुरेश चौथाईवाले यांच्या लाल्या मांग या कादंबरीला तर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रा़ भगवान भोईयर यांच्या पहाट प्रबोधनाची या वैचारिक ग्रंथाला आणि श्याम बेले यांच्या संदेश कविता संग्रहाला देण्यात आला आहे़ क्रांती गुरू लहुजी साळवे पुरस्कार बापु पाटील यांच्या पांढरं सोनं व छाया बेले यांच्या चकवा या कथासंग्रहास दिला आहे़
सामाजिक पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे भारत दाढेल, शरद वाघमारे यांना जाहीर झाला आहे़ क्रांतीपिता लहुजी साळवे क्रीडारत्न पुरस्कार जिम्नॅस्टीक मार्गदर्शक जयपाल रेड्डी, सुनील जाधव जनार्दन गुपीले यांना दिला जाणार आहे़ पुरस्काराचे वितरण ३ एप्रिल रोजी शासकीय बहुउद्देशीय सांस्कृतीक सभागृह पॉलीटेक्नीक कॉलेज येथे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात होणार आहे़