‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:55 AM2017-09-10T00:55:36+5:302017-09-10T00:55:36+5:30

दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे.

satire poetry programme | ‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे. जनतेची सेवा करणाºया नगरसेवकांना तर पगारही मिळत नाही. निवडणुकीत ओतलेला पैसा मग कुठून काढतील. मग, रस्त्यावर खड्डे पडले नाही तर त्या बिचाºयांची घरे कशी चालतील... जेवढे खड्डे अधिक तेवढी कमाई अधिक... यामुळे कितीही ओरड होवो, आंदोलन होवो, रस्त्यावर खड्डे पडणारच... असा मार्मिक टोला हिंदीतील हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांनी लगावला.
युवक बिरादरीतर्फे आयोजित एलोरा मिलन सोहळ्यानिमित्त सुरेंद्र शर्मा औरंगाबादेत मुक्कामी आले होते. त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी दीड तास दिलखुलास गप्पा मारल्या. देशातील सद्य:स्थितीचे धीरगंभीरपणे; पण मार्मिक विवेचन त्यांनी केले. ‘मी रचलेले विडंबनपर काव्य चुका करणाºयांना सावध करण्यासाठी असते, त्यांना जखमी करण्यासाठी नव्हे,’ असे म्हणत त्यांनी धर्माच्या नावावर चाललेल्या दुकानदारीच्या विषयाला हात घातला.
धर्म को मानते है पर धर्म की नही मानते
काही लोकांनी धर्माच्या नावावर दुकानदारी सुरू केलीय, या प्रश्नावर सुरेंद्र शर्मा म्हणाले, पहिले धर्माच्या नावावर उन्नती झाली... नंतर म्हटले गेले की, आम्ही धर्म वाढविणार, त्यानंतर धर्माच्या नावावरच पोळी भाजणे सुरू केले. आता तर धर्मालाच ओरबडणे सुरू केले आहे. आम्ही धर्म स्वीकारतो; पण त्या धर्माचे विचार प्रत्यक्षात अमलात आणत नाहीत. यातूनच भोंदूबाबा तयार झाले.
दहशतवाद संपवा तरच शांती
देशात गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. दहशतवाद, नक्षलवादीवृत्ती त्यातूनच वाढीस लागली आहे. दहशतवादी मारलेच पाहिजेत, तसेच दहशतवादच मिटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण देशात काही जणांकडे फेकून देण्याइतक्या पोळ्या आहेत, तर काही जणांना त्या पोळीचे दर्शन होत नाही, हा विरोधाभास संपविला तर अनेक समस्या कमी होतील.
जीएसटी कसा गोळा करावा हे सरकारने मधमाशीकडून शिकावे
मी काही अर्थतज्ज्ञ नाही, पण देशात फिरतो. लोक जे बोलतात त्यावरून जीएसटीमुळे सुविधा नाही तर अडचणी अधिक वाढल्या असे दिसते. कारण, व्यवसाय सोडून तांत्रिक समस्यांना जास्त तोंड द्यावे लागत आहे. चाणक्याने असे म्हटले होते की, मधमाशी फुलाची सुंदरता व सुगंध खराब न करता जसे मध सोशून घेते तसाच कर गोळा करावा. मी सुद्धा तेच म्हणतो की, सरकारनेही व्यापाºयांना कोणताही त्रास न होऊ देता जीएसटी गोळा करावा.
दुसºयांच्या पत्नीवर काव्य केले तर लोक मारतील
तुम्ही नेहमी आपल्याच पत्नीवर व्यंगात्मक काव्य का करता, असे विचारता सुरेंद्र शर्मा म्हणाले की, दुसºयाच्या पत्नीवर काव्य केले, तर लोक मला कविसंमेलनातच स्टेजवर येऊन मारतील. त्यामुळे आपल्याच पत्नीवर काव्य करीत असतो; मात्र आता माझा माझ्या पत्नीतील इंटरेस्ट कमी झाला, पण तुम्ही एवढा इंटरेस्ट का दाखविता, असे म्हणत त्यांनी हास्य फुलविले.

Web Title: satire poetry programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.