प्रशासन गतिमान झाल्याचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:22+5:302020-12-17T04:33:22+5:30
-- औरंगाबाद : कोरोनामुळे रखडलेले प्रशासनाचे गाडे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे टिमवर्क, सामूहिक जबाबदारी, फाईल ...
--
औरंगाबाद : कोरोनामुळे रखडलेले प्रशासनाचे गाडे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे टिमवर्क, सामूहिक जबाबदारी, फाईल ट्रॅकिंग सिस्टिममुळे विद्यापीठाचे प्रशासन पारदर्शक व गतिमान झाले याचे मनस्वी समाधान आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व अधिकारी व संवैधानिक अधिकारी यांच्याशी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी मंगळवारी सिफार्ट सभागृहात दुपारी ३ ते ६ दरम्यान आढावा बैठक घेऊन संवाद साधला.
प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
बैठकीला अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--
आज व्यवस्थापन परिषदेची बैठक
--
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तर अधिसभेची बैठक येत्या २८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.