लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये कांद्याला समाधानकारक भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:17+5:302021-07-10T04:04:17+5:30
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये कांद्याला १८३० रुपये तर सरासरी १६५० रुपये क्विंटल भाव मिळाला. ...
लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये कांद्याला १८३० रुपये तर सरासरी १६५० रुपये क्विंटल भाव मिळाला. समाधानकारक भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिगोणी ४० रुपये तसेच गोणी भरण्याचा खर्च वाचला आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्याचे वाहनधारकाला कमिशन देणे वाचले आहे. तर लिलावात वाहन फाळके भरण्यासाठी ५० ते १०० रुपये मिळत असल्याने ५०० पेक्षा अधिक मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. सरसकट विविध प्रकारच्या कांद्याचा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान टळत आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरसह फुलंब्री, कन्नड, वैजापूर तालुक्यातील कांद्याची आवक मार्केटमध्ये होत असून शुक्रवारी २२५ कांदा गाडीची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त १८३० तर सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
फोटो :
090721\img_20210709_180628.jpg
लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये कांदा गोण्या भरताना मजूर.