सतीश चव्हाण गटाला धक्का; अपक्षांची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:54 AM2017-11-27T00:54:40+5:302017-11-27T00:54:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले. यात एकूण २0 जागांपैकी ३ जागांवर अपक्षांनी बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलला १३ आणि ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचला ४ जागा मिळाल्या. आमदार सतीश चव्हाण यांच्या संस्थेचे डॉ. अविनाश येळीकर यांना पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांना धक्का मानला जात आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. या मतदानाच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मात्र अपेक्षेप्रमाणे मतमोजणीचा वेग अतिशय मंद होता. प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापीठ प्राध्यापक गटातील ४४२ मते मोजण्यासाठी तब्बल सायंकाळचे ६ वाजले. या मतमोजणीत सुुरुवातीला संस्थाचालक (पान ८ वर)
हे उमेदवार विजयी
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत अधिसभेच्या संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातून कपिल आकात, गोविंद देशमुख, संजय निंबाळकर आणि भाऊसाहेब राजळे विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल म्हस्के तर महिलातून मनीषा राजेश टोपे विजयी झाल्या आहेत.