साठे झाले अधिकृत
By Admin | Published: September 14, 2014 11:16 PM2014-09-14T23:16:48+5:302014-09-14T23:37:23+5:30
सोनपेठ : कुचकामी कायद्यांमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना अभय मिळाले आहे.
सोनपेठ : कुचकामी कायद्यांमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना अभय मिळाले आहे. प्रशासनाचे वाळूसाठे जाहीर लिलावाचे नाट्य संपल्यानंतर आता हे साठे अधिकृत झाल्यामुळे वाळूमाफियांना पुन्हा एकदा आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
तालुक्यातील रस्त्यांना २० कि.मी.चा गोदाकाठ लाभला आहे. तालुक्याबाहेरचे धनाढ्य, पुढारी व स्थानिकांच्या मदतीने अनेक वर्षांपासून गौण खनिज लुटण्याचा हा प्रकार सुरु आहे. वाळूच्या नियमबाह्य वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. लिलाव सुटल्यानंतर यावर्षी तरी प्रशासन नियमबाह्य वाळूसाठ्यावर प्रतिबंध घालेल, ही जनमाणसातील अपेक्षा फोल ठरली. वाहनांना पकडायचे, प्रत्यक्षात कारवाई व अप्रत्यक्षात अर्थपूर्ण बोलणी अशा प्रकारांमुळे कारवाईचे नाटक थोडेफार दिवस सुरु होते. प्रशासनाच्या कोणत्याच कारवाईला न जुमानता वाळू माफियांनी वाळूसाठे तयार केले. आजघडीला शेकडो पटीने भाव वधारलेल्या वाळूमधून कोट्यवधी रुपये पदरात पडत आहेत. काही दिवसांपूर्वी वाळूसाठ्यांचा लिलाव करुन या साठ्यांना अधिकृत करण्यात आल्यामुळे आता तर प्रशासनाच्या समोरच साठ्यातील वाळूविक्री होत आहे. एकूण तुझेही भले आणि माझेही भले, अशातला किळसवाणा प्रकार सुरु असल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)