शुल्कामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:47 AM2017-07-27T00:47:08+5:302017-07-27T00:47:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत २०१६-१७ मधील विद्यार्थ्यांची शिक्षण व इतर शुल्काची रक्कम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत २०१६-१७ मधील विद्यार्थ्यांची शिक्षण व इतर शुल्काची रक्कम महाविद्यालयांना मिळाली नाही़ त्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांचे शुल्क संगणकप्रणाली सुरु झाल्यानंतर बँक खात्यावर जमा होणार असून त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश, परीक्षेपासून वंचित ठेवल्यास संबंधित महाविद्यालयांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहे़
२०१६-१७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील ४५ हजार ७२० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्ती, फ्रिशीपसाठी अर्ज केले आहेत़ त्यापैकी ३८ हजार १३३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे़ तर ७ हजार ४१० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत़ आजघडीला संगणकप्रणाली मास्टेक या कंपनीचा करार संपल्यामुळे शासनाने शिष्यवृत्तीचे संकेतस्थळ बंद केले आहे़ शासनाच्या आयटी विभागाकडून युनिटाईड पोर्टल विकसित करण्यात येत आहे़ त्यात डीबीटी पोर्टलद्वारे ई-स्कॉलरशिप योजना राबविण्यात येणार आहे़ २०१२ पासून ई-स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे़
त्यामध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन कनिष्ठ, वरिष्ठ, पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयातील अनु़जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते़ तसेच संबंधित महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क व इतर शुल्काची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़