स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:44 AM2017-07-27T00:44:57+5:302017-07-27T00:45:13+5:30
नांदेड: कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर २४ जुलैपासून सुरू केलेले साखळी उपोषण व निदर्शने तिसºया दिवशीही सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर २४ जुलैपासून सुरू केलेले साखळी उपोषण व निदर्शने तिसºया दिवशीही सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाºयांची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप मराठवाडा नगरपालिका, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांची या ना त्या कारणावरुन होत असलेली हकालपट्टी थांबवावी या प्रमुख मागणीसाठी २४ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येत आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, आठवड्यातून एक सुटी द्यावी, कामगारांना सुरक्षाविषयक साहित्य द्यावे तसेच कामावरुन कमी केलेल्या कामगारांना रुजू करुन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या साखळी उपोषणात कौशल्या आठवले, शेवंता नरवाडे, चौतराबाई सूर्यवंशी, मुक्ताबाई छडीमारे, मायाबाई खरात, सत्वशीला थोरात, सरस्वती हनमंते, गीताबाई सावंत, गयाबाई वैद्य, संदीप गोडबोले आदींचा समावेश आहे.