सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:28 AM2018-06-25T00:28:31+5:302018-06-25T00:29:33+5:30

पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.

Savate detained threatening to death on Facebook | सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना एकाने फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटीचौक पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या चार जणांना पोलिसांनी सहआरोपी केले.
संभाजी भोसले (३८, रा. सिडको), असे धमकी देणाºया व्यक्तीचे नाव आहे. सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. सिनगारे म्हणाले की, आरोपी भोसले याने २३ जून रोजी सायंकाळी ६.३८ वाजता फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्याने ‘मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. जे फक्त ब्राह्मणांना प्रोटेक्शन देत आहे. थांबू शकत असाल तर मला थांबवा...’ असा मजकूर आहे. एवढेच नव्हे, तर भोसले याने अतुल सावे यांना अश्लील शिवीगाळ करणारी आणखी एक पोस्ट टाकली. या पोस्टला पाच जणांनी लाईक केले आणि चार जणांनी त्यावर कमेंट टाकली. कमेंटस् टाकणाºयांशी संगनमत करून ही धमकी दिल्याचे आ. सावे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तडकाफ डकी कारवाई करून आरोपी भोसले याला अटक केली. अश्लील शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि आय.टी. अ‍ॅक्टनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल के ल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांना निवेदन
आ. सावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी आल्याचे कळताच भाजप शिष्टमंडळाने रविवारी दुपारी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात फेसबुक अकाऊंटवर पोस्ट टाकणाºया आणि त्याला उत्तेजित करणाºयांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिरीष बोराळकर, गणेश नावंदर, मंगलमूर्ती शास्त्री आणि नगरसेवक, पदाधिकाºयांची उपस्थिती होती. दरम्यान आ. सावे म्हणाले हा शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.

Web Title: Savate detained threatening to death on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.