सव्वा लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:25 AM2017-07-31T00:25:01+5:302017-07-31T00:25:01+5:30
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला. कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकºयाच्या थेट कर्जखात्यात जमा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीस जवळपास सव्वालाख शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत थकित असलेले ४७ हजार २४७ शेतकरी आहेत. या शेतकºयांची २२० कोटी १४ लाखांची रक्कम होते तर दीड लाखांपेक्षा जास्त थकित कर्ज असलेले ३ हजार ३८२ शेतकरी आहेत. या शेतकºयांकडे १०४ कोटी ५४ लाखांची थकबाकी आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ५९ हजार ८४० शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये नियमित पीक कर्जापोटी १३० कोटी ६४ लाख रुपये परत केले आहेत.
जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये नियमित आणि मध्यम/दीर्घ मुदतीकर्ज हप्ता परतफेड केलेले ६ हजार ९७० शेतकरी आहे. या शेतकºयांची ही रक्कम ४३ कोटी ८२ लाखांवर जाते.
शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ आतापर्यंत एकाही शेतकºयांना झाला नाही. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज आता भरण्याचे फर्मान शासनाने काढले आहे. सध्या पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. त्यात तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास मोठ्या रांगा लागत आहेत. शेतकरी पीक विमा भरण्यासाठी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबींमुळे कर्जमाफीचा विषय सद्य:स्थितीत बाजूला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कधी मिळेल? याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.