सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बाजी!

By Admin | Published: May 30, 2017 10:58 PM2017-05-30T22:58:17+5:302017-05-30T22:59:36+5:30

बीड : बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला.

Savitri lakinike again! | सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बाजी!

सावित्रीच्या लेकींचीच पुन्हा बाजी!

googlenewsNext

ल्ोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा आपणच भारी असल्याचे सावित्रीच्या लेकींनी दाखवून देत बाजी मारली. जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.४९ टक्के एवढा लागला. औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या स्थानावर आहे. निकाल जाहीर होताच मुला- मुलींनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यात ३० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात मुले आणि मुली मिळून ३७ हजार २७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. पैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात जिल्ह्यातून २३ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. पैकी २३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २१ हजार २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १३ हजार ५३३ विद्यार्थिनींनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी १३ हजार ४७१ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १२ हजार ४०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचे प्रमाण ८९.५७ एवढे आहे, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१० एवढे असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल ९०.४९ एवढा लागला. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत यशाची परंपरा कायम ठेवली
आहे.
बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी या तालुक्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर पाटोदा, केज, शिरूर आणि वडवणी तालुक्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल
बीड जिल्ह्यात विज्ञान, कला व वाणिज्य शाखा व एमसीव्हीसी मिळून ३७ हजार १५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६, कला शाखेचा ८३.९१ आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९२.१७ आणि एमसीव्हीसीचा ८४.८२ टक्के लागला.
विज्ञान शाखेमध्ये १८ हजार ४४२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३४६ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, १० हजार ८८४ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, ५४२५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली.
कला शाखेत १४ हजार ८९३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी ८३१ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, ७ हजार ९१५ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ३ हजार ६५५ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली. वाणिज्य शाखेत २ हजार ८८६ परीक्षार्थींनी परीक्षा देत ३२६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ११२१ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ६४६ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी मिळविली. एमसीव्हीमध्ये १५३५ परीक्षार्थींनी
परीक्षा दिली. त्यापैकी विशेष प्राविण्य ७५, प्रथम श्रेणी ८७४ व ३५३ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी
पटकावली.

 

Web Title: Savitri lakinike again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.