सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:21+5:302021-01-08T04:06:21+5:30

मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान या प्रतिष्ठानतर्फे उल्कानगरीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्वाती कांबळे, सुनीता भगत, राजश्री सरपे, छाया ...

Savitribai Phule's birthday celebrated with enthusiasm as Women's Education Day | सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी

googlenewsNext

मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान

या प्रतिष्ठानतर्फे उल्कानगरीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्वाती कांबळे, सुनीता भगत, राजश्री सरपे, छाया पाटील, सीमा कानिंदे, दिव्या सरपे, सुशीला पोपलवार आदींची उपस्थिती होती.

जीगिषा इंटरनॅशनल स्कूल

अध्यक्षस्थानी प्राचार्या मनीषा नाथ होत्या. सुजाता काकडे व पायल काकडे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन बाळासाहेब पवार यांनी केले. सावित्रीबाईंच्या विचारांना प्रत्यक्ष जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन प्राचार्या नाथ यांनी यावेळी केले.

बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच

या मंचतर्फे कॅनाट प्लेस येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कांचन सदाशिवे होत्या. भास्कर लहाने, दुर्गादास गुडे, रमेश धनेगावकर व अंबादास रगडे आदींनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. गायक संभाजी गायकवाड व उत्तम म्हस्के यांनी सावित्रीबाईंवरील सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

अनंत भालेराव विद्यामंदिर

या शाळेत रोहिणी जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले. सविता मणूरकर यांनी गीत सादर केले. सोनल नलावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार सुधा कुलकर्णी यांनी मानले.

पँथर्स रिपब्लिकन पार्टी

या पक्षातर्फे संजयनगर मुकुंदवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. शहर उपाध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अमोल तुपे, विलास बोर्डे, रवी देहाडे, रवी जाधव, संजय जाधव, कुशल मोरे, जुगल डोंगरे, अनिकेत वाघमारे आदींची उपस्थिती होती.

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळा

शिवशंकर कॉलनी येथील या शाळेत सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.पी. बोरसे हे होते. एस.के. बन्सिले व एस.ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्ही.बी. नेरकर यांनी आभार मानले.

रेणुका हायस्कूल

सातारा परिसरातील रेणुका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका एम.एन. वाघुले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एम.ए. महाजन व एस.ए. गव्हाणे यांची यावेळी भाषणे झाली.

महात्मा फुले पतसंस्था

या पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम झाला. सुवर्णा जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रद्धा पुंड यांनी आभार मानले. रावसाहेब गाजरे, बाळकृष्ण बनसोड, संगीता खोबरे, एल.एम. पवार, अनिता देवतकर, साईनाथ जाधव, शिवाजी जाधव, नारायण पाटील, बाबासाहेब जेजूरकर यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

सावता परिषद

गणेशनगर, छत्रपती शिवाजीनगर रोड, सावित्रीबाई फुले चौकात जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी आ. अतुल सावे हे होते. कैलास गायकवाड, विजय वाघमारे, अभिमन्यू उबाळे, शिवानंद झोरे, शारदा कोथंबिरे, संगीता पवार, मीरा देशपांडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वैष्णवी तिडके व दिव्यानी उबाळे यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती. बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार संजय आढाव यांनी मानले.

Web Title: Savitribai Phule's birthday celebrated with enthusiasm as Women's Education Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.