जेसा एनएक्सच्या अध्यक्षपदी सावन चुडीवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:26+5:302021-05-25T04:05:26+5:30
औरंगाबाद : जैन इंजिनिअर्स सोसायटी फाउंडेशनअंतर्गत शहरातील जैन समाजातील तरुण अभियंते आणि आर्किटेक्ट यांच्यासाठी दि. १७ मे रोजी जेएसए ...
औरंगाबाद : जैन इंजिनिअर्स सोसायटी फाउंडेशनअंतर्गत शहरातील जैन समाजातील तरुण अभियंते आणि आर्किटेक्ट यांच्यासाठी दि. १७ मे रोजी जेएसए एनएक्स या नवीन मंचची स्थापना करण्यात आली. जेसा एनएक्सच्या अध्यक्षपदी सावन चुडीवाल यांची तर सचिवपदी पीयूष पापडीवाल यांची निवड झाली.
जैन इंजिनिअर्स सोसायटी फाउंडेशनचे अध्यक्ष एस. के. जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत क्लबचे ऑनलाइन उद्घाटन झाले. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रसिंह जैन, उपाध्यक्ष राजेश पाटणी, सचिव निकेतन सेठी आणि वेस्ट झोनचे अध्यक्ष सनतकुमार जैन यांची विशेष उपस्थिती होती.
सोसायटीच्या औरंगाबाद चाप्टरचे अध्यक्ष सुनील सेठी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सचिव शिरीष खंडारे यांनी चाप्टरचे कार्य, उद्दिष्ट याबाबत माहिती दिली.
जेसा एनएक्स औरंगाबाद चाप्टरचे संस्थापक अध्यक्ष सावन चुडीवाल, उपाध्यक्ष निपुण लोढा व अपूर्व बोहरा, सचिव पीयूष पापडीवाल, सहसचिव सौरभ सेठी, कोषाध्यक्ष दीपेश कांकरिया, सहकोषाध्यक्ष साहिल भंडारी, जनसंपर्क अधिकारी शौरी जैन आणि संयुक्त जनसंपर्क अधिकारी सिद्धी कटारिया यांनी आपापल्या पदाची शपथ घेत कार्यभार स्वीकारला. संकल्प पहाडे, शौरी जैन यांनी सूत्रसंचालन केले.
तरुणांच्या नव्या संकल्पना, नवे विचार आणि उत्साह या माध्यमातून क्लबतर्फे नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, असे चुडीवाल यांनी सांगितले. कमल पहाडे, चेतन ठोले, नितीन बोहरा, आनंद मिश्रीकोटकर यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थिती होती. पीयूष पापडीवाल यांनी आभार मानले. दर्शन संचेती, इंद्रजित शाह, प्रद्युम्न शाह, रजनीश कटारिया या सल्लागार मंडळाचेही कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
फोटो ओळ :
जेसा एनएक्स क्लबची नूतन कार्यकारिणी.