ढाकेफळमध्ये दरोडा; हजारोंचा ऐवज लुटला

By Admin | Published: November 28, 2015 12:43 AM2015-11-28T00:43:04+5:302015-11-28T00:47:13+5:30

ढाकेफळ : ग्रामीण भागात दरोड्याचे सत्र सुरूच आहे. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या शिसोदे कुटुंबियांच्या घरावर दरोडा पडला

Scandal; Thousands looted | ढाकेफळमध्ये दरोडा; हजारोंचा ऐवज लुटला

ढाकेफळमध्ये दरोडा; हजारोंचा ऐवज लुटला

googlenewsNext


ढाकेफळ : ग्रामीण भागात दरोड्याचे सत्र सुरूच आहे. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या शिसोदे कुटुंबियांच्या घरावर दरोडा पडला. कापडाने तोंड बांधलेल्या दोन दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला, तलवारीचा धाक दाखवून ५६ हजारांचा मौल्यवान ऐवज आणि रोख रक्कम पळविली.
संजय सुखदेव शिसोदे हे त्यांच्या कुटुंबियांसह झोपलेले असताना दोन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. गाढ झोपेत असलेल्या शिसोदे यांना हात हलवून उठविले. शिसोदे गडबडून उठले, तेव्हा त्यांच्या समोर नंगी तलवार हातात घेतलेला दरोडेखोर उभा होता. त्या दरोडेखोराने शिसोदे यांना ‘काट डालुंगा’ असे धमकावले, तर दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या डोळ्यात अचानक मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे शिसोदे पुरते गोंधळून गेले व त्यांना प्रतिकाराची संधीच मिळाली नाही.
माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने येळगंगा नदीपर्यंत दरोडेखोरांचा माग काढला. दरोडा प्रतिबंधक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
शिसोदे कुटुंबियांकडून काहीच प्रतिकार होत नव्हता व दरोडेखोरांनाही घरात काही सापडत नव्हते. त्यामुळे शेवटी दरोडेखोरांनीच माठातील पाणी शिसोदे यांना आणून दिले व तोंड धुण्यास सांगितले. त्यानंतर शिसोदे यांच्याकडून दरोडेखोरांनी कपाट उघडून घेतले. त्यातील कपडे व साड्या अस्ताव्यस्त फेकून दिल्या. ड्रॉवरमधील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, आठ गॅ्रम सोन्याचे झुंबर, दीड ग्रॅमची नाकातील नथ, मंगळसूत्र, दोन भाराचे चांदीचे जोडवे, दोन मोबाईल हँडसेट व रोख २५०० रुपये असा ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेतला. घरातून बाहेर पडल्यानंतर या दरोडेखोरांनी शिसोदे यांच्या घरासह आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून पोबारा केला.

Web Title: Scandal; Thousands looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.