रक्ताचा तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:18 AM2017-10-31T00:18:22+5:302017-10-31T00:18:29+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़

The scarcity of blood persists | रक्ताचा तुटवडा कायम

रक्ताचा तुटवडा कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़
जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई, मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चलन टंचाई अशा विविध प्रकारच्या टंचाईने नागरिक त्रस्त होते़ मात्र आता रक्ताची टंचाई भेडसावत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ जिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशी रक्तपेढी उभारण्यात आली; परंतु, या रक्तपेढीत रक्तच नसेल तर उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात ५०० रक्त पिशव्यांचा साठा असलेली रक्तपेढी उभारण्यात आली आहे़
विशेष म्हणजे या ठिकाणी अद्ययावत असे रक्त विघटन केंद्रही कार्यरत आहे़ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ३० ते ४० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते़ त्यामुळे किमान २५० रक्त पिशव्यांचा साठा रक्तपेढीमध्ये असेल तर तो आठ दिवस पुरु शकतो़ मात्र मागील काही महिन्यांपासून रक्तपेढीतील काही गटांचा रक्तसाठा हा चक्क शून्यावर येऊन ठेपला आहे़ याचा अर्थ रक्ताचा ठणठणाट असलयाने रुग्णांना ऐनवेळी धावपळ करावी लागते़ ठराविक गटाचे रक्त आवश्यक असल्यास नातेवाईक किंवा त्या रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून रक्तदान करावे लागते़ या सर्व परिस्थितीत वेळेचा अपव्यय आणि मन:स्ताप रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़
सहा महिन्यांपासून रक्ताचा तुटवडा असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातून रक्तसाठा वाढविण्यासाठी फारसे प्र्रभावी प्रयत्न झाले नाहीत़ त्यामुळे रक्ताच्या साठ्यात ही वाढ झालेली नाही़ सोमवारी घेतलेल्या माहितीनुसार रक्तपेढीमध्ये ए आणि बी या दोन रक्तगटाची एकही रक्त पिशवी शिल्लक नव्हती तर एबी रक्तगटाच्या १५ आणि ओ या रक्तगटाच्या २५ पिशव्या उपलब्ध होत्या़ जिल्हा रुग्णालयात दररोज २५ ते ३० रक्त पिशव्यांची आवश्यकता लागते़ त्या तुलनेत दोन्ही रक्तगटांच्या मिळून ४० रक्त पिशव्या पेढीत उपलब्ध असल्याने रुग्णांना खाजगी रक्तपेढ्यांची दारे ठोठावी लागत आहेत़

Web Title: The scarcity of blood persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.