खवले मांजराची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:04 AM2021-08-14T04:04:57+5:302021-08-14T04:04:57+5:30
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे खवले मांजर पकडले असून त्यांची विक्री करणार असल्याची माहिती अजिंठा वनविभागाला ...
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे खवले मांजर पकडले असून त्यांची विक्री करणार असल्याची माहिती अजिंठा वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्राच्या पथकाने डमी ग्राहक बनवून खवले मांजर विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींकडे पाठविले. आरोपींचा विश्वास संपादन केल्यानंतर खवल्या मांजराचा सौदा ६ लाख ५० हजारांत ठरला. सौदा पक्का करून त्यांना पाच हजार रुपये आगाऊ दिल्याने आरोपींनी गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उर्वरित रक्कम घेऊन सावळदबारा परिसरात खवले मांजर घेण्यासाठी त्या वनविभागाच्या डमी ग्राहकाला बोलावले होते. दरम्यान, अजिंठा वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी अगोदरच सापळा रचून त्या ठिकाणी खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या आरोपी नसीर खा लाडखा तडवी (२४), अमिर समशेद खा तडवी (१८) व एक सोळा वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक (तिघे रा. देव्हारी, ता. सोयगाव) यांना विक्रीसाठी आणलेल्या खवले मांजरासह ताब्यात घेतले आहे.