सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

By Admin | Published: March 16, 2016 11:59 PM2016-03-16T23:59:01+5:302016-03-17T00:03:53+5:30

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

Scholarship to 7740 people of Savitri | सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

googlenewsNext

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत हिंगोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील ७७४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना आधार दिला जात असून जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी मधील एससी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६०० रूपये याप्रमाणे तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाने दिली. योजनेतंर्गत ६० लक्ष खर्च करण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची रक्कम रहिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुसूचित जातीमधील १६८० विद्यार्थी व २२५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.
इंटरनेटमधील तांत्रिक अडचणी मुख्याध्यापकांची डोकेदुखी बनली असून वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनकाडून अर्ज प्रक्रियेच्या तारखेत दरवेळेस बदल केजा जातो. जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यात इंटरनेटच्या सुविधेत वारंवार होणारा बिघाड या विविध अडचणींळे अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची तारीख वारंवार बदलते.

Web Title: Scholarship to 7740 people of Savitri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.