२़३० कोटींची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 12:51 AM2016-03-20T00:51:32+5:302016-03-20T01:00:02+5:30

नांदेड :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १४७़२७ कोटींच्या अर्थसंकल्पास अधिसभा बैठकीत मंजुरी देण्यात आली़

Scholarships of Rs | २़३० कोटींची शिष्यवृत्ती

२़३० कोटींची शिष्यवृत्ती

googlenewsNext

नांदेड :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १४७़२७ कोटींच्या अर्थसंकल्पास अधिसभा बैठकीत मंजुरी देण्यात आली़ ११़२६ कोटी एवढा तुटीचा अर्थसंकल्प वित्त व लेखाधिकारी डॉ़ गोविंद कतलाकुटे यांनी सादर केला़ संशोधनाला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून २़३० कोटींची आॅनलाईन शिष्यवृत्ती विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली़
कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरु डॉ़ गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी़ बी़ पाटील, बीसीयुडी डॉ़ दीपक पानसकर, परीक्षा नियंत्रक डॉ़ रवी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम ७५ (२) एफ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे हा अर्थसंकल्प तीन विभागात सादर करण्यात आला़ विद्यापीठास बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२२५ लाख रुपये अनुदान मंजूर आहे़ त्यापैकी ५१३ लाख रुपये प्राप्त झाले असून २०१६-१७ मध्ये किमान ९२५ लाख रुपये प्राप्ती अपेक्षित आहे़ चालू वर्षात महाराष्ट्र शासनाकडून विकास निधी अंतर्गत १५०० लाख अनुदान प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे़
अर्थसंकल्पीय अधिसभा बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली़ संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी मानधन या शीर्षअंतर्गत मार्चअखेर २५ लाख रुपये उपलब्ध असून पुढील वर्षासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली़ विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक वर्गातील एम़फिल़ व पीएच़डी़ संशोधकांना यावर्षी राजीव गांधी, मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आॅफलाईन २४ विद्यार्थी असून त्यासाठी ५३ लाख रुपये अनुदान प्राप्त होईल़ परिसरातील १०६ विद्यार्थी आॅनलाईन शिष्यवृत्तीचा लाभ घेत असून त्यांना २३० लाख रुपये संशोधन शिष्यवृत्ती मिळत आहे़ कुलगुरु सहाय्यता निधी या योजनेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली़ शिवाय संशोधन प्रोत्साहन योजना १५ लाख, विद्यार्थिनी दत्तक योजना १५ लाख, कर्मचारी कल्याण निधीसाठी १५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली़
एक शिक्षक एक कौशल्य योजनेअंतर्गत या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे़ परभणी उपकेंद्राचा विकास केला जाणार आहे़ सिंथेटीक ट्रॅककरिता शासनाकडून अनुदान प्राप्त होईल त्याकरिता टोकन स्वरुपात १३० लाख रुपयांची तरतूद केली आहे़ २०१६-१७ साठी लघू विद्यापीठ परिसरातील संकुल संशोधक प्रकल्पासाठी १५ लाख व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक संशोधकासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ याशिवाय इतर आर्थिक तरतुदीमध्ये विद्यापीठ ग्रंथालयासाठी ७५ लाख, लातूर उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीसाठी १ कोटी, अल्पसंख्याक वसतिगृहासाठी ७० लाख रुपये शासनाकडून प्राप्त होतील़ इंडोर स्पोर्टस् हॉलसाठी युजीसीकडून २२५ लाख रुपये प्राप्त होतील़ उर्वरित १५० लक्ष रुपयांचा खर्च विद्यापीठ निधीतून केला जाणार आहे़ अधिसभा बैठकीत विद्यापीठ अर्थसंकल्पाबरोबरच वार्षिक अहवालासही मंजुरी देण्यात आली़
विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाने उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्रती पेज २ रुपये प्रमाणे शुल्क आकारण्यात यावे असा प्रस्ताव मांडला़ यापूर्वीही मागणी करुन त्याची पूर्तता होत नसल्याने त्यांनी अंगावरील शर्ट काढून सभागृहाचा त्याग केला़ तद्नंतर त्यांना परत बोलावून सदरील प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले़ पदवीदान महाविद्यालय स्तरावर व्हावे, विद्यापीठ परिसर विकास, पाणी पुरवठा आदी विषयावर चर्चा झाली़

Web Title: Scholarships of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.