पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यत शिष्यवृत्ती; कागदपत्रे काय लागतात?

By राम शिनगारे | Published: November 24, 2023 08:04 PM2023-11-24T20:04:10+5:302023-11-24T20:04:50+5:30

शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

Scholarships up to three thousand for girls in class V to X; What documents are required? | पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यत शिष्यवृत्ती; कागदपत्रे काय लागतात?

पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन हजारांपर्यत शिष्यवृत्ती; कागदपत्रे काय लागतात?

छत्रपती संभाजीनगर : शाळेतून मुलींची गळती कमी व्हावी, दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ६०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती?
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

एससींना ६००, तर इतरांना अडीच ते तीन हजार
राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विद्यार्थ्यांना १५०० हजार रुपये मिळतात. त्याशिवाय इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

निकष काय?
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल, शाळेतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

कागदपत्रे काय लागतात?
राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मागील वर्षाचे गुणपत्रक ही कागदपत्रे आवश्यक असतात. ही सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध असते. शाळांमधील शिक्षकाचीही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवितात. त्याठिकाणी तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

योजनेचा लाभ घ्यावा
सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नावे किंवा प्रस्ताव सादर करावीत. तसेच, जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा.
- ओमप्रकाश रामावत, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Scholarships up to three thousand for girls in class V to X; What documents are required?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.