चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

By मुजीब देवणीकर | Published: September 25, 2023 07:44 PM2023-09-25T19:44:13+5:302023-09-25T19:53:46+5:30

या घटनेमुळे मनपात एकच खळबळ उडाली.

School ended and the child remained in the classroom, the watchman locked the child and escaped | चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रोजाबाग शाळेतील इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थिनी उम्मेखैर मुजम्मिल तय्यब ही वर्गात असताना सोमवारी दुपारी वॉचमनने खोलीला कुलूप लावले. थोड्या वेळानंतर मुलगी खिडकीजवळ येऊन रडू लागली. आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कुलूप तोडून चिमुकलीला बाहेर काढले. तथापि या घटनेनंतर पालकांनी मनपा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी स्वत: चौकशी सुरू केली.

नेहमीसारखी दुपारी २ वाजता शाळा सुटली; पण इयत्ता पहिलीतील उम्मेखैर ही चिमुकली वर्गातच राहिली. कंत्राटी वॉचमन विठ्ठल बमणे याने कुलूप लावले. शिक्षिका नर्गिस फातेमा यासुद्धा निघून गेल्या. कोंडली गेलेली चिमुकली वर्गखोलीच्या खिडकीजवळ येऊन जोरात रडू लागली. शाळेच्या परिसरात दिवसभर मुले खेळत असतात. त्यांना तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. लहान मुलांनी कॉलनीतील काही मोठ्या माणसांना बोलावून आणले. त्यांनी अगोदर घटनेचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर वॉचमन, शिक्षिका यांना फोनवर कळविले. ते परत येईपर्यंत परिसरातील नागरिकांनी कुलूप हातोड्याने तोडले. भेदरलेल्या चिमुकलीला बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी
महापालिकेचे शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी सांगितले की, झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षिका आणि वॉचमनला बोलावून जबाब घेतला. मंगळवारी सकाळी मी शाळेत जाणार आहे. पालकांनाही बोलावून चर्चा करण्यात येईल. चौकशीत कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल. या भागातील काही रहिवाशांनी लग्नकार्यासाठी शाळेच्या परिसराची मागणी केली होती. शिक्षिकेने नकार दिला. त्यावरून काही वाद सुरू होते. त्यातून हा प्रकार घडवून आणल्याची तक्रार आहे. सर्व गोष्टींची शहानिशा केली जाईल.

Web Title: School ended and the child remained in the classroom, the watchman locked the child and escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.