रांजणगावातून शाळकरी मुलगी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:02 AM2021-03-05T04:02:41+5:302021-03-05T04:02:41+5:30
फोटो क्रमांक- स्नेहा शेवलेकर (बेपत्ता) ----------------------- पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील अर्बन व्हॅली ...
फोटो क्रमांक- स्नेहा शेवलेकर (बेपत्ता)
-----------------------
पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील अर्बन व्हॅली ते तिरंगा चौक या रस्त्यावर पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी दररोज मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. याचबरोबर सायंकाळी घराकडे परतणाऱ्या नागरिकांनाही चाचपडत ये-जा करावी लागते. या मुख्य रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
-----------------------
स्वखर्चातून ड्रेनेजलाईनची दुरुस्ती
वाळूज महानगर : वाळूजच्या दत्त कॉलनीतील नागरिकांनी स्वखर्चातून सेफ्टी टँकचे चोकप काढून ड्रेनेजलाईनची दुरुस्ती केली. या वसाहतीतील ड्रेनेजलाईनचे सेफ्टी टँक फुटल्यामुळे पाच दिवसांपासून ड्रेनेजचे सांडपाणी वाहत होते. या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने कॉलनीतील नागरिकांना वर्गणी गोळा करून ड्रेनेजलाईनची दुरुस्ती केली.
---------------------------
एकेरी वाहतुकीने वाहनधारक त्रस्त
वाळूज महानगर : रांजणगावात रस्त्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. येथील छत्रपती शिवाजी स्मारक ते रांजणगाव फाटा या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून गैरसोय थांबविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
------------------------------
कमळापूर रस्त्यावर पडले खड्डे
वाळूज महानगर : कमळापूर-वाळूज या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार खड्ड्यात आदळत असून अपघातही घडत आहे. या मार्गावर कामगारांची मोठी वर्दळ राहत असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक व कामगारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने वाहनधारकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
--------------------------